तृतीयपंथीय व्यक्तीला झालेल्या मारहाणीत मृत्यू

Published on -

श्रीरामपूर ;- बाजार समिती परिसरातील जगदंबा सर्व्हिस या दुकानाच्या गाळ्यासमोर तृतीयपंथीय व्यक्तीला झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

१७ ऑक्टोबर रोजी अश्विनी नुरजहाँ शेख (वय ४५, रा. श्रीरामपूर) तृतीयपंथीयाला अज्ञात व्यक्तीकडून मारहाण केली होती.

त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार २९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार सुरेश रामचंद्र मुसळे यांनी फिर्याद दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe