अहमदनगर :- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात चोमेवाडी परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी रोहिणी नवनाथ निंबाळकर (चोमे) हिने माहेरचे नातेवाईक मामा यांच्याकडून शेतीचे कामाकरिता व दुकानासाठी पैसे आणावेत म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करुन तुला घरातील काम नीट येत नाही. तू येथे राहू नको, तसेच नवरा नवनाथ सुभाष निंबाळकर याला दुसरी बायको करुन दे, असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
या छळास कंटाळून रोहिणी निंबाळकर या विवाहित तरुणीने शेतातील शेततळ्यातील पाण्यात उडी घेतली व त्यात ती बुडून मयत झाली. याप्रकरणी मयत रोहिणीचे मामा दत्तात्रय लक्ष्मण हरगुडे, रा. केसनंद हवेली पुणे,
यांच्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलिसांत आरोपी नवरा नवनाथ सुभाष निंबाळकर, सासरा, सुभाष दगडू निंबाळकर, दीर संतोष सुभाष निंबाळकर (चोमे), जाव उषा संतोष निंबाळकर (चोमे) सर्व रा. बेलवंडी, चोमेवाडी, श्रीगोंदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
- मोठी बातमी ! सरकारचं नवं फर्मान, आता मुस्लिमांना हिंदूंची जमीन खरेदी करता येणार नाही !
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी विप्रो कंपनीची मोठी घोषणा! आता हा आर्थिक लाभ मिळणार
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! फेब्रुवारीत चार हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार !
- आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार दीड लाख रुपयांची थकबाकी !
- इन्फोसिसच्या शेअर्सची रॉकेट तेजी ! नफा कमी झाला तरी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी, ‘हे’ आहे कारण













