किडन्या काढून घेण्याची धमकी दिल्याने तरुणाची घरात गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर- पैसे न दिल्यास तुझ्या दोन्ही किडन्या काढून घेऊ अशी धमकी दिल्याने अहमदनगर येथील एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

याप्रकरणी गोकुळ कालिदास सरोदे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,

अंकुश कालिदास सरोदे (वय 30) याने अमित चोरडिया यांच्याकडून 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते.

ती रक्कम परत घेण्यासाठी चोरडिया याने तगादा सुरु केला होता. वसुलीसाठी आल्यावर चोरडिया याने अंकुश सरोदे याला धमक्याही दिल्या होत्या. तुझ्या दोन्ही किडन्या काढून घेऊ अशी धमकी दिली होती.

त्याच्या धमकीला घाबरत, त्याच्या नेहमीच पैसे मागण्याला अंकुश हा वैतागल्याने त्याने त्याच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने फाशी घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी मयताचा भाऊ गोकुळ कालिदास सरोदे याने दिलेल्या फिर्यादीवरून अमित चोरडिया यांच्याविरुद्धात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment