पिस्तूलचा धाक दाखवत पावणेसात लाख लांबवले

Published on -

काेपरगाव | लोहकणेवस्ती येथील श्रद्धा होंडा शोरुमजवळून ज्युपिटर स्कूटरवरुन जाताना ३ ते ४ भामट्यांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकू व पिस्तूलचा धाक दाखवत साकुरी येथील राकेश वढेर (पटेल) यांच्या गाडीच्या डिकीत ठेवलेले पावणेसात लाख लांबवले.

या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १८ मे रोजी दुपारी ४ दरम्यान घडली. राकेश वढेर (साकुरी) हे आंगडिया पेढीची शिर्डी व कोपरगाव येथील रक्कम जमा करून शिर्डीकडे येत होते.

कोकमठाण शिवारात श्रद्धा होंडा शोरुमजवळ डोळ्यात मिरची पूड टाकून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत भामट्यांनी डिकीतील सहा लाख ७४ हजार रुपये काढून घेतले. नंतर गाडीसह चोरट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe