माहेरून ५० लाख रुपये आणावेत यासाठी शिक्षिकेचा छळ

Published on -

अहमदनगर :- हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावेत यासाठी शिक्षिकेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिक्षिका दीपाली रवींद्रकुमार घुमटकर यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर पती रवींद्रकुमार घुमटकर, सासू संजीवनी तुकाराम घुमटकर, हेमंत तुकाराम घुमटकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी छळाचा हा प्रकार घडला आहे.

नवीन दवाखाना उघडण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावेत यासाठी दीपाली यांचा मानसिक व शारिरिक छळ करण्यात येत होता. पैसै न आणल्याने शिवीगाळ करून मारहाण करून उपाशीपोटी ठेवून घरातून बाहेर काढले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe