धक्कादायक: बाजरीच्या शेतात तरुणीवर बलात्कार

Published on -

कर्जत :- तालुक्यातील राशिन भागात राहणाऱ्या एका २० वर्षाच्या ओळखीच्या तरुणीला आपण तुझ्या बहिणीला आणायला सिद्धटेकला जावू, असे सांगून दुचाकीवर बसवून करपरवाडी गावच्या शिवारातील बाजरीच्या शेतात नेवून आरोपीने बळजबरीने बलात्कार केला.

यावेळी आरोपीला त्याच्याबरोबरील महिलेने साथ दिली. या प्रकरणी पिडीत तरुणीने काल कर्जत पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन सुरज मनचक्या भोसले, मोहिनी सूरज भोसले, दोघे रा. सिद्धटेक, ता. कर्जत यांच्याविरुद्ध भादवि कलमा दाखल करण्यात आला असून सपोनि माने हे पढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe