साईबाबा संस्थानकडून पत्रकारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी दोन महिन्यांपूर्वी श्रीसाई मंदिराच्या परिसरात चित्रीकरण व वृत्तांकन केल्याप्रकरणी एबीपी माझाच्या दोघा प्रतिनिधींसह

एका कॅमेरामनवर शासकीय कामात अडथळा आणणे व साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून, या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संस्थानच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांच्या विलंबाने दाखल केलेल्या या गुन्ह्यामागे सूडाची भावना असल्याचा आरोप शिर्डी पत्रकार संघासह जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर २०२० मध्ये राज्य शासनाच्या आदेशान्वये श्री साईबाबा मंदिर कोविड नियमांचे पालन करून दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.

यावेळी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता समाधी मंदिराच्या मागील बाजूस गुरुस्थान मंदिराच्या समोर एबीपी माझा वाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी, नितीन ओझा व त्यांचा कॅमेरामन अशा तिघांनीही साईभक्तांच्या मुलाखती घेण्यास व त्याचे थेट प्रक्षेपण करण्यास सुरूवात केली.

यावेळी तेथे मोठी गर्दी झाल्याचा आरोप ठाकरे यांनी फिर्यादीत केला आहे. या वृत्ताने अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात संताप निर्माण झाला असून बगाटे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News