गळफास घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

Published on -

पारनेर : पारनेर तालुक्यातील पोखरी (पवळदरा) येथे ३२ वर्षांच्या तरुणाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून रामदास शेटीबा भोसले (वय ३२ वर्षे), रा. पोखरी (पवळदरा) या विवाहित तरुणाने घरातील खिडकीच्या लोखंडी अंगलच्या गजास सुताच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

ही घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. घटनेच्या अगोदर रामदासची पत्नी अनिता, स्वत:ची दोन मुले व दिराची दोन मुले, असे पाचजण सरपण आणण्यासाठी रानात गेले होते.

अनिता व मुले सरपण घेऊन घरी आल्यानंतर पतीने गळफास घेतल्याचे पहिले व तिने दिराला फोन करून माहिती दिली. याबाबतची माहिती भानुदास शेटीबा भोसले यांनी टाकळीढोकेश्वर दूरक्षेत्रात दिली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. तेथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe