संगमनेर :- अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला घारगाव पोलिसांनी अटक केली.
फारूक नानाभाई शेख (३२, रा. शेरी चिखलठाण, राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च २०१९ मध्ये धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजेच्या वेळी हा प्रकार घडला होता.
आरोपीने साकूरजवळील मांडवे येथे जात मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून
जांबुत बुद्रूक येथील मुळा नदीपात्रातील केटीवेअरजवळ तिच्यावर अत्याचार केला होता. शुक्रवारी (२१ जून) संबंधित पीडित मुलीने हा प्रकार पोलिसांना सांगितला.
- तुम्हालाही घरकुल मंजूर झाल आहे का ? आता घरबसल्या पाहता येणार गावातील घरकुल लाभार्थ्यांची यादी
- शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात मोठा बदल ! मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला नवा मार्ग, कोणत्या गावातून जाणार?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पत्नीच्या नावाने दोन लाखाची गुंतवणूक करा, मिळणार 90 हजार रुपयांचे फिक्स व्याज
- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ दिवशी मिळणार हॉल तिकीट
- 8वा वेतन आयोग : देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाची भेट कधी मिळणार ?













