श्रीरामपूर : तालुक्यातील गोंडेगाव येथील नवनाथ म्हसे यांच्या खून प्रकरणी त्यांच्याच पत्नीला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याप्रकरणी नवनाथ यांच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, दि. १४ जुलै रोजीच्या रात्री नवनाथ म्हसे हे आपल्या कुटुंबासमवेत आपल्या शेतातील घरामध्ये झोपलेले असताना दोन जणांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश करुन नवनाथ म्हसे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते.
याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी एकास ताब्यात घेतले होते. परंतु पुढे अधिक तपास केला असता नवनाथ यांच्या पत्नी रुपाली हिचा संशय पोलिसांना आला. त्यांनी रुपाली हिस चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली.
यामध्ये रुपालीने हे कृत्य आपणच केल्याचे कबूल केले आहे. डिवायएसपी राहुल मदने यांच्याशी संपर्क साधला असता आरोपी पत्नीने पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे, असे सांगितले.
याप्रकणी तिला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांनी अधिक तपास केला असता रुपाली ही मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपासात आणखी उलगडा होईल, असेही पोलिसांनी सांगितले.
- मोठी बातमी ! सरकारचं नवं फर्मान, आता मुस्लिमांना हिंदूंची जमीन खरेदी करता येणार नाही !
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी विप्रो कंपनीची मोठी घोषणा! आता हा आर्थिक लाभ मिळणार
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! फेब्रुवारीत चार हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार !
- आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार दीड लाख रुपयांची थकबाकी !
- इन्फोसिसच्या शेअर्सची रॉकेट तेजी ! नफा कमी झाला तरी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी, ‘हे’ आहे कारण













