अहमदनगर :- नगर शहरातील बसस्थानकासमोर बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यूप्रकरणी दोघांना अटक झाली आहे.
शेख फैजान अब्दुल रौफ ऊर्फ फैजान बाबासाहब जहागीरदार (वय 26), शेख अराफत अब्दुल रौफ उर्फ अराफत बाबासाहब जहागीरदार (वय 24, दोघे रा. खिस्त गल्ली, नगर) ही अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 29 एप्रिल रोजी किरण उध्दव जगताप या तरुणाला किरकोळ कारणावरुन डोक्यावर मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
सदर घटनेबाबत जखमीचे वडील उध्दव यशवंत जगताप (वय 43, रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन, नगर) यांनी अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान जखमी किरण जगताप याचेवर आनंदऋषी हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना मंगळवारी निधन झाले होते.
आरोपी हे पुण्यातील कोंढवा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे स्टेशन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती.
औताडे यांनी गुन्ह्यातील आरोपी फैजान जहागीरदार हा त्याचे साथीदारांसह कोंढवा, पुणे परिसरात लपून बसलेला आहे.
त्यावरून पोलिसांनी कोंढवा, पुणे येथे जावून मिळालेल्या माहीतीनूसार कोंढवा परिसरात आरोपींचा शोध घेवून दोघांना अटक केली आहे.
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.
- राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये…
- डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम
- नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे