एटीएम मशिनच्या दरवाजाला करंट 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्यातील घारगाव येथील हॉटेल दौलत रिफ्रेशमेंट येथील असणाऱ्या भारतीय स्टेट बँक शाखेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नारायण आहेर यांना शॉक बसल्याने एटीएम मशीन व दरवाजात करंट उतरल्याचे समोर आले. सुदैवाने ते यातून बालंबाल बचावले. मंगळवारी (दि. २५) सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

घारगावला भारतीय स्टेट बँकेची शाखा असून बँकेपासून काही मिनिटांच्या अंतरावरच हॉटेल दौलत याठिकाणी बँकेचे एटीएम मशीन आहे. मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास आहेर हे पैसे काढण्यासाठी याठिकाणी आले होते. त्यांनी दरवाजाला हात लावला असता त्यांना जोरदार शॉक बसल्याने ते मागे फेकले गेले.

नेमके काय झाले त्यांनाही कळेना. त्यानंतर आजूबाजूच्या काही नागरिकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. दरवाजात करंट उतरल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली.

दरवाज आणि एटीएम मशिनला करंट आहे की नाही ते पाहण्यासाठी काहींनी टेस्टर लावला असता दरवाजा व एटीएम मशीनला करंट उतरल्याचे दिसून आले. काही वेळाने तो करंट बंदही झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment