अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : सद्या सोशल मीडियाचा कोण कसा वापर करेल ते सांगता यात नाही. आजवर विविध पुढारी, नामांकित लोकांच्या नावे बनावट संदेश पाठवला असल्याचे आपण ऐकले आहे.
मात्र थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावेच नगर मध्ये बनावट संदेश फिरत असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या नावाने कोरोनाबाबत जिल्हाभर बनावट संदेश फिरतो आहे.
सोशल मीडियावरील या संदेशाने नागरिकांनांही धास्ती भरली आहे. हा संदेश खरा आहे की खोटा? याची पडताळणी न करता नागरिकांकडून तो फॉरवर्ड केला जात आहे.
या चुकीच्या संदेशाने जिल्ह्यात चिंता वाढवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार असून नागरिकांनी काय दक्षता घ्यायची? याबाबतच्या १७ प्रकारच्या सूचना या संदेशात देण्यात आल्या आहेत.
‘अहमदनगर कलेक्टर यांनी दिलेल्या सूचना’, ‘जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचना’ किंवा संदेशाच्या शेवटी ‘जिल्हा माहिती कार्यालय’ यांच्या नावाने हा संदेश सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
संदेशामधील सूचना या शास्त्रीयदृष्ट्या मान्य आहेत का?,या संदेशामुळे नागरिकांना चुकीची माहिती जात आहे. त्याबद्दल आता कोणाला जबाबदार धरणार? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविणा-यांना प्रशासन काही कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews