बापरे ! ते चक्क होम क्वॉरन्टाईनचा शिक्काच मारायचा विसरले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव तपासणी करून जरी त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले तरी त्यांच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारला जातो.

व त्यांना घरात वेगळे ठेवले जाते. मात्र अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात संशयिताच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्काच मारायचा विसले असल्याचा गलथानपणा उघकीस आला आहे.

नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, जिल्हा प्रशासनाकडून कडेकोट उपाययोजना राबविल्या जात आहेत. असे असले तरी जिल्हा रुग्णालयाचा गलथानपणा उघकीस आला आहे.

देशमुख गल्लीतील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली. त्यांचे अहवालही निगेटीव्ह आले. त्या संशयितांना घरीही सोडले परंतु त्या संशयित रुग्णांच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्काच मारायचा विसरले असल्याची घटना घडली.

जिल्हा प्रशासनाने पाच रुग्णांच्या पुढे रुग्ण संख्या असलेला भाग सील करण्यात आला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.

तसेच त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यासाठी हातावर शिक्का मारला जातो. परंतु, सिव्हीलच्या प्रशासनाने कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का न मारताच सोडण्यात आले.

ते व्यक्ती घरी निघाले परंतु, पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून चौकशी केली. हातावर शिक्का असणार्‍यांना घरी सोडण्यात आले.

परंतु, सिव्हीलमधून कोरोनाची चाचणी करुन आलेल्या आणि हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का नसलेल्यांना पुन्हा पोलिसांनी सिव्हीलला पाठविण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment