धोका वाढला, आजपासून जिल्ह्यात निर्बंध..!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रशासनाने निर्बंध घातले असून, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विवाह समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींची मर्यादा दिली आहे.(restrictions in district)

तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची मर्यादा देण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी जारी केले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारपासून जिल्ह्यात विवाह समारंभ बंद किंवा मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त ५० व्यक्तींची राहणार आहे.

मेळावे, कार्यक्रम, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंद किंवा मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना देखील उपस्थितांची संख्या ५० मर्यादित ठेवण्यात आली आहे.

अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तसे आदेश जारी केले असून,

आदेशाचे उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंडनीय व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe