तरुण तलाठ्यावर प्राणघातक हल्ला 

Published on -

राहुरी: तालुक्यातील कात्रड- गुंजाळे येथील तलाठी सतीश सुभाष पाडळकर (वय 35) या तरुण तलाठ्यावर चार तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना उंबरे-कात्रड-गुंजाळे रस्त्यावर काल मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

तलाठी सतीश सुभाष पाडळकर हे  वांबोरीमार्गे जात असताना दोघांनी त्यांना दगड मारले. त्यात एक दगड लागल्याने पाडोळकर जागीच थांबले. नेमकी हीच संधी साधून या दोन तरुणांनी त्यांच्यावर सळई आणि सत्तूरसदृश हत्याराने हल्ला केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe