अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- संगमनेरात कोरोनाने हाहाकार माजविला असताना भल्याभल्यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. यात नामदार महोदयांच्या काकाश्रींचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला आहे.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. तर या काकाश्रींच्या संपर्कात आलेल्या तिघांना आज कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर देखील आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. आज संगमनेर तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. आज एकाच दिवसात 33 रुग्ण रॅपीड अॅन्टीजन टेस्टमधून तर 15 रुग्ण खाजगी रुग्णालयातून अशा 48 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
तर अकोले तालुक्यात आज एकाच दिवशी नऊ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घाबरुन न जाता आपापली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved