अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारातील शेततळ्यातील पाण्यात बुडून एका युवकास जलसमाधी मिळून मृत्यू झाला. प्रदिप दत्तू गोर्डे (वय २०) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
शनिवारी (दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेने वडझरी गावावर शोककळा पसरली आहे.
वडझरी खुर्द शिवारात कौठेकमळेश्वर रस्त्यानजीक असलेल्या संजय नाना गुंजाळ यांच्या मालकीच्या शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी प्रदिप दत्तू गोर्डे (वय २०) तसेच अन्य दोघे पोहण्यासाठी गेले होते.
दरम्यान पोहत असताना प्रदिप गोर्डे यास दम लागून तो पाण्यात बुडला. दोघा मित्रांनी त्यास वाचविण्यासाठी प्रयत्न केला. त्याचवेळी शेततळ्यात टाकलेली रस्सी तुटली.
प्रदिप गोर्डे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात समजताच पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांनी पोलिसांना खबर दिली.
त्यानंतर पोलीस हवालदार एकनाथ बर्वे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी येवून स्थानिक युवकांच्या मदतीने शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे हलविला.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एकनाथ बर्वे घटनेचा अधिक तपास करीत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®