अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राहता तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायती वर्चस्व कायम ठेवलं आहे. त्यांचं गाव असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीची सत्ता त्यांना गमवावी लागली आहे.
आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांनी राहता तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चांगला जोर लावला होता. अचूक नियोजनाच्या बळावर त्यांना राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश आलं.

तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायती जिंकण्यात विखेंना यश आलं आहे. विखे गटांचा या पंचायतींवर दणदणीत विजय झाला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved