धमकी देणार्‍या महिलेवर कारवाई करण्याची मागणी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- भिंगार शहरातील उद्योजक असलेले सुमित कुमार संतोष प्रसाद यांच्या एजन्सी समोर एका महिलेने अतिक्रमण केले आहे.

सदरचे अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली असता त्या महिलेने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणात न्याय मिळून सदर महिलेवर कारवाई होण्याची मागणी उद्योजक सुमित कुमार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सुमित कुमार संतोष प्रसाद यांची भिंगार येथील विजय लाईन चौकात एस.के. इंटरप्राईजेस नावाची एजन्सी आहे. त्यांच्या एजन्सीच्या समोरील मोकळ्या जागेत एका महिलेने अनाधिकृत अतिक्रमण केले आहे.

सदर महिलेस अतिक्रमण काढण्यास वारंवार विनंती केली असता, सदर महिलेने उद्योजक सुमित प्रसाद यांना मला जातीवाचक शिवीगाळ केली व माझ्यावर बळजबरी केली अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून टाकण्याची धमकी देत आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस ठाणे भिंगार कॅम्प येथे गेले असता त्यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी उद्योजक सुमित कुमार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन निवेदन दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!