संगमनेर: आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधान केल्याने भाजपच्या वतीने शहर पोलिस निरीक्षक अभय परमार याना निवेदन देण्यात आले .“हम १५ करोड है मगर १०० करोड को भारी है, असे चिथावणिखोर वक्तव्य जाहीर सभेत केले.
हिंसेस प्रवृत्त करणारे वक्तव्य लोक प्रतिनिधीना अशोभनीय आहे. पठाण विरुद्ध कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले.

भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजू, हाफिज शेख, दिलीप रावल, कल्पेश पोगुल, विकास गुळवे, भारत गवळी, मनोज जुंद्रे, सोमनाथ बोरसे, चिराग साहू, अरुण थीटमे, जग्गू शिंदे, अरुण शिंदे, देविदास कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.