नैराश्यातून महिलेचा मुलीसह विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कुटुंबातील गृहकलहातून मुलांसह घर सोडून कोपरगाव तालुक्यातील महिला शिर्डीला आली. मात्र, येथे आल्यानंतरही कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे साई संस्थानचे भोजनालयही बंद असल्याने हाताला कामही नाही व खाण्यासाठी अन्नही मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून सदर महिलेने मुलीसह विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सध्या दोघींवर साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. याबाबत अधिक माहिती अशी : शिंगणापूर (ता. कोपरगाव) येथील मंगल किसन ढोले (वय ४५) यांनी गृहकलामुळे मुलगी सुमन विठ्ठल कुदळे (वय २५), मुलगा गौरव (वय ३) व सौरव (वय एक) यांच्यासह घर सोडले.

ते पायी शिर्डीला आले. येथे कामासाठी प्रयत्न करूनही कामही मिळेना. त्यात शिर्डी येथे भोजनालयासमोरच महिलेने शेवटी कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. या महिलेने व तिच्या मुलीने विषारी औषध सेवन केले. ही बाब जवळच असलेल्या साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक व काही तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ साईनाथ रुग्णालयात त्यांना दाखल केले. आता दोघींचीही प्रकृती सुधारत आहे.दरम्यान, सदर महिलेचे पती किसन ढोले यांनी आठ दिवसापूर्वीच पत्नी व मुले घरातून निघून गेल्याची तक्रार कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता ही महिला कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील असल्याची समजले.

यासंदर्भात किसन ढोले यांना माहिती देण्यात आली. गरिबी, बेरोजगारी व दोन महिन्यांपासून नसलेला रोजगार यातून गृहकलह यातून हा प्रकार घडला असावा, असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment