अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : पाथर्डीचे नायब तहसिलदार पंकज नेवसे यांचे फेसबुक अकाऊंट हँक करुन त्यावर वादग्रस्त मजकुर व्हायरल करण्यात आला आहे.
पत्रकार व नायबतहसिलदार यांच्यात एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण होतील असा तो मजकुर आहे.

नेवसे हे वाळु तस्कराकडुन हप्ते मागत असल्याचा उल्लेखही वादग्रस्त मजकुरामधे आहे. शिवाय मी मँडम पर्यंत हप्ते देतो म्हणजे या मँडम नेमक्या कोण ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नायब तहसिलदार पंकज नेवसे यांना पुणे येथील एका मित्राचा फोन आला व तुमच्या फेसबुक अकाऊंडवर वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्याचे सांगितले.
त्यानंतर नेवसे यांनी फेसबुक अकाऊंट पाहीले असता त्यांना खालील प्रमाणे पोस्ट व्हायरल कुणीतरी केल्याचे समजले व आपले अकाऊंट हँक झाल्याची खात्री झाली.
दरम्यान नायब तहसिलदार पंकज नेवसे यांनी गुरुवारी रात्री अज्ञात आरोपीने फेसबुक अकाऊंड हँक केल्याची तक्रार पोलिसात नोंदविली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews