अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-राहात्यामधील नगर-मनमाड राज्य महामार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.
याच्या दुरुस्तीबाबत नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली. नागराध्यक्षांनीही खड्डे बुजविण्याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत होते.
त्यामुळे नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्वत: हातात फावडे व घमेले घेऊन वाळू, खडी व सिमेंटच्या साह्याने खड्डे बुजवून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी गांधीगिरी करत संबंधित विभागाचा निषेध केला.
रस्त्यावर कुठेही रेड फ्लॅशर्स, दिशा दर्शक बसविलेले नाही. रस्त्याच्या दुभाजकांमध्ये अनावश्यक जागा सोडलेली आहे. रस्त्याच्या साईडने मारलले पांढरे व लाल पट्टे दिसेनासे झाले आहेत.
हा सर्व प्रकार गंभीर असून, याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याशी डॉ.पिपाडा यांनी दूरध्वनीवर संपर्क करुन याबाबत अधिकाऱ्यांना तातडीने सूचना करण्यासंदर्भात विनंती केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा