नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवारांनी एकूण ३८ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छाननीमध्ये २६ उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.
यापैकी सुदर्शन लक्ष्मण शितोळे यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला, तर पक्षाकडून सादर केलेला अर्ज अवैध ठरला. इतर पाच उमेदवारांचे अर्जही अवैध ठरल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिली.

शुक्रवारी झालेल्या छाननीमध्ये नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे- वाकळे नामदेव अर्जुन (बहुजन समाज पार्टी), सुजय राधाकृष्ण विखे (भारतीय जनता पार्टी), संग्राम अरुण जगताप (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना-पक्ष), धीरज मोतिलाल बताडे (राईट टू रिकॉल पार्टी), फारूख इस्माईल शेख (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), सुधाकर लक्ष्मण आव्हाड (वंचित बहुजन आघाडी).
तसेच संजय दगडू सावंत (बहुजन मुक्ती पार्टी), अप्पासाहेब नवनाथ पालवे (अपक्ष), कमल दशरथ सावंत (अपक्ष), सबाजीराव महादू गायकवाड (अपक्ष), गौतम काशिनाथ घोडके (अपक्ष), दत्तात्रय अप्पा वाघमोडे (अपक्ष), भास्कर फकिरा पाटोळे (अपक्ष), रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे (अपक्ष), रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (अपक्ष), सुदर्शन लक्ष्मण शितोळे (अपक्ष).
याशिवाय शेख आबिद मोहम्मद हनिफ (अपक्ष), शेख रियाजोद्दिन फजलोद्दिन दादामियाॅ (अपक्ष), गणेश बाळासाहेब शेटे (अपक्ष), साईनाथ भाऊसाहेब घोरपडे (अपक्ष), सुनील शिवाजी उदमले (अपक्ष), ज्ञानदेव नरहरी सुपेकर (अपक्ष), संजीव बबन भोर (अपक्ष), संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष) यांचेही उमेदवारी अर्ज वैध ठरले.
धनश्री विखे यांचा अर्ज भाजपकडून मूळ उमेदवार वैध ठरल्यामुळे, दहा सूचकांची नावे नसल्याने अवैध ठरला. सुदर्शन शितोळे यांनी परिपूर्ण शपथपत्र दाखल केले नाही.
भागवत गायकवाड यांचे सर्व सूचक अहमदनगर मतदारसंघातील नाहीत. विलास लाकूडझोडे यांनी अनामत रक्कमच भरली नाही. जाकीर शेख व पोपटराव दरेकर यांना सूचकच नव्हते.
धनश्री सुजय विखे (भारतीय जनता पार्टी), पोपटराव गंगाधर दरेकर (क्रांतिकारी जयहिंद सेना), सुदर्शन लक्ष्मण शितोळे (हिंदू एकता आंदोलन पक्ष), जाकीर रतन शेख (भारतीय मायनॉरीटीज सुरक्षा महासंघ), भागवत धोंडिबा गायकवाड (अपक्ष), विलास सावजी लाकूडझोडे (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.
- बिहार विधानसभा निवडणुक : भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव पराभवाच्या उंबरठ्यावर, छपरा विधानसभा मतदारसंघात काय घडतंय?
- Oneplus 15 लाँच होताच कंपनीचा आणखी एक मोठा धमाका ! Oneplus 15R लॉन्चिंगची संभाव्य तारीख पण आली समोर
- टोयोटाच्या ‘या’ गाडीवर मिळतोय चक्क 13 लाखाचा डिस्काउंट ! Fortuner पण झाली स्वस्त, वाचा सविस्तर
- ट्यूबलेसचा जमाना गेला, आता भारतात आलेत एअरलेस टायर्स ! Airless टायर कसे काम करतात ? याचे फायदे अन तोटे पहा…
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! Cappillary Technologies च्या IPO मध्ये गुंतवणूक करावी की नाही? तज्ञ सांगतात….











