अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- श्री रेणुकामाता मल्टीस्टेटचे संचालक योगेश चंद्रकांत भालेराव यांचे शुक्रवारी पहाटे ह्रदयविकाराने दुःखद निधन झाले. ते 37 वर्षांचे होते.
श्री रेणुकामाता मल्टिस्टेटच्या विस्तारात त्यांचा सिंहांचा वाटा असून देशातील नऊ राज्यात मल्टिस्टेटच्या १०७ शाखा आहेत. त्यांची आर्थिक क्षेत्रातील जाणकार अशी ओळख होती.
व्यायामाचा छंद असल्याने त्याची प्रकृती सुदृढ होती. तसेच धार्मिक क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. वडिलोपार्जित जमीनीत श्री रेणुकामातेचे मंदिर उभारून अमरापूरचे देवस्थान नावारूपाला आणले आहे.
या देवस्थानच्या नवरात्रोत्सवासाठी दरवर्षी माहूर ते अमरापूर पायी ज्योत आणत. तेरा वर्षात एकदाही खंड पडला नव्हता. चार वर्षांपूर्वी ‘माझी रेणुका माऊली` ही मालिका सामटिव्हीवर प्रदर्शित केली होती.
रेणुका मातेवर चित्रपट करण्याचा त्यांचा मनोदय होता. त्यांचे मागे आई मंगलताई, पत्नी योगिता, मुलगा रुद्र व मुलगी टिनू ही लहान मुले, श्री रेणुकामाता मल्टिस्टेटचे संस्थापक प्रशांत भालेराव उर्फ नाना,
विधिज्ञ नितीन हे दोन बंधू, वहिनी जयंती व पुतणे प्रद्युम्न व रेणुका असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नगर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
विविध शाखातील सेवक वर्गाने सोशल डिस्टन्सिगचे भान जपत आपल्या लाडक्या पोशिंद्याचे अखेरचे दर्शन घेतले . यावेळी तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांनी
‘कै. योगेशच्या अकाली जाण्याने कलीयुगातील राम लक्ष्मणाची जोडी फुटली, मीही ज्या परिवाराचा घटक आहे तो श्री रेणूका माता परिवार आज पोरका झाला. ‘अशा शब्दात श्रध्दांजली अर्पण करून भालेराव कुटुंबाचे सांत्वन केले.`
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved