अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- दोन बहिणींवर केलेल्या बलात्कारानंतर त्यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली; प्रकरणात नराधमांनी दोन्ही मुलींचे डोळे बाहेर काढून त्यांचे कानही कापले.
अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडली; मात्र पोलिसांनी सदर मुुलींचा मृत्यू तलावात बुुडून झाल्याचे म्हटले आहे. मुलींच्या शरिरांवर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. मुलींचे डोळे काढून टाकण्यात आले असून त्यांचे कान कापण्यात आल्याचा आरोप घरच्यांनी केला आहे.
मात्र, पोलिसांनी ही घटना एक अपघात असल्याचे सांगत दोन मुलींचा मृत्यू तलावात बुडून झाल्याचे म्हटले आहे. सोमवारी फतेहपूरच्या असोधर ठाणे क्षेत्रातून छिछनी गावांतून दोन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. यातील एका मुलीचे वय १२ असून दुसरी ८ वर्षाची आहे. दोघींचेही मृतदेह गावाजवळील तलावात आढळून आले.
मुलींचे मृतदेह छिन्नविच्छन अवस्थेत होते, असे मुलींच्या घरच्या लोकांचे म्हणणे आहे. दोन्ही मुलींचा एक-एक डोळा काढून टाकण्यात आला आहे. त्यांचे कानही कापून टाकण्यात आले आहेत. त्यांच्यावर बलात्कार करुन निर्घुण हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हे प्रकरण उघड होताच लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून मुलींच्या मृतदेहांवर रात्रीच पोस्टमार्टम करण्यात आले. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp