अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- सहकार क्षेत्रातील लौकिक प्राप्त बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरु आहे.
काल शुक्रवारी भानुदास मुरकुटे यांनी शेती पूरक मतदार संघ आणि बिगर शेती मतदार संघासाठी दाखल केलेले प्रत्येकी एक असे दोन अर्ज माघारी घेतले.
अर्ज माघारीची अंतिम मुदत येत्या दि.११ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनपर्यंत असून त्यानंतरच निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मागील सहा दशकांच्या वाटचालीत शेतकरी हिताचे अनेक पथदर्शी निर्णय बँकेने घेतले.ज्याची अंमलबजावणी राज्यस्तरावर झाली.
पक्षीय गटबाजी बाजूला ठेवित जुन्या- जाणत्यांनी बँकेच्या कारभाराची दिशा निश्चित केली. त्यामुळे जिल्हा बँकेचा प्रगतीचा आलेख चढता राहिला. मागील चार महिन्यापासून बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकिचे पडघम वाजत होते.
आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसह बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या नियंत्रणात सुरु झाला आहे.
दि. १९ ते दि.२५ जानेवारीपर्यंत २१ संचालक पदासाठी उच्चांकी अर्ज दाखल झाले. छाननीनंतर वैधनामनिर्देशनपत्रांची सूची निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी प्रसिद्ध केली. उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत दि.११ फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved