अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश आहेत. यासाठी शासकीय नियमावली तयार करण्यात आली आहे.
परंतु या नियमावलीला हरताळ फासत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे.
ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास करताना ताब्यात घेतलं आहे.
गुरुवारी सकाळी पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी येथे त्यांचे वाहन श्रीगोंद्याच्या निवासी नायब तहसीलदार चारुशीला पवार आणि योगीता ढोले यांच्या पथकाने थांबविले. परवान्याची चौकशी केली.
मात्र, त्यांच्याकडे परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेतले. जिल्हा बंदीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसूल प्रशासनाने ही कारवाई केली असून याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews