ठरले! आज पासून रेल्वे गाड्यांच्या बुकिंगला सुरूवात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन केल्यानंतर रेल्वे,विमान, बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता शासनाने लॉकडाऊनचा चौथा टप्प्या संपल्यानंतर अर्थात 1 जूनपासून रेल्वे सेवा काही प्रमाणात सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे.

त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. हे करताना काही काळजी घेण्यासही सांगितलं आहे. लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने सर्व व्यवहार ठप्प होता.

लोकांच्या हाताला काम नव्हतं. आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात विशेष 200 ट्रेन्स 1 जूनपासून धावणार आहेत. त्याचं बुकिंग गुरुवार (21 मे) सकाळी 10 पासून सुरू होईल.

यातल्या 50 ट्रेन्स एकट्या मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या असतील. या गाड्या या श्रमिक ट्रेन्स व्यतिरिक्त आहेत. श्रमिक ट्रेन मोठ्या प्रमाणावर धावणार आहेत. यासाठी अनेक नवे नियम करण्यात आले आहेत.

– यात एकही अनरक्षित डबे नसतील, तिकीट बुक केलं आणि कन्फर्म असेल तरच प्रवास करण्याची आणि स्टेशनवर जाण्याची मुभा आहे.

– चादर, ब्लॅंकेट आणि पडदे दिले जाणार नाहीत. – एसी ही मध्यम स्वरूपात असेल. – तिकीट ऑनलाइन करता येईल, बुकिंग काउंटर वर मिळणार नाही.

– या ट्रेन्स त्यांच्या नेहमीप्रमाणे थांब्यावर (स्टेशनवर) थांबतील. – तात्काळ किंवा ट्रेनमध्ये तिकीट दिला जाणार नाही. – गाडीत मास्क घालणं बंधनकारक असेल.

– थर्मल स्क्रिनिंग म्हणजेच ताप आहे की नाही हे तपासण्यासाठी किमान दीड तास आधी पोहोचणं बंधनकारक आहे. जर ताप आढळला तर प्रवास करू दिला जाणार नाही, त्याऐवजी पूर्ण पैसे परत दिले जातील.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe