समाधानकारक पाऊस सुरू असल्याने मुळा धरण ५९ टक्के भरले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर समाधानकारक पाऊस सुरू असल्याने कोतूळकडून मुळा धरणात येणारी पाण्याच्या आवकेमध्ये समाधानकारक वाढ झाली.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजता कोतूळकडून मुळा धरणात तब्बल १६ हजार ७५० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी धरणाचा पाणीसाठा १५ हजार ३७२ दशलक्ष घनफूट झाल्याने मुळाधरण ५९ टक्के भरले.

कोतूळकडून मुळा धरणाच्या दिशेला येणारे दिवसभराचे नवीन पाणी शुक्रवारी सकाळी धरणात पोहचणार असल्याने शुक्रवारी धरणाचा पाणीसाठा ६२ टक्क्यांवर जावून पोहचणार आहे.

गुरुवारी सकाळी कोतूळकडून मुळा धरणात १४ हजार ३२१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी पाण्याची आवक २ हजार ५०० क्युसेकने वाढली.

मागील वर्षी आजच्या दिवशी सायंकाळी कोतूळकडून मुळा धरणात ३ हजार ४१२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी सायंकाळी ६ वाजता बंद करण्यात आले होते. आज धरणाची पाणीपातळी १७९०.३० झाली. मागील वर्षी आजच्या दिवशी पाणी पातळी १८११ झाली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment