खा. सुजय विखे म्हणतात, रोहित पवारांनी ‘हे’ थांबवले पाहिजे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- खा. सुजय विखे हे जिल्हा परिषदमध्ये एका बैठकीच्या निमित्ताने आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला.

ते म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे रोज भूमिपूजन व उद्घाटन करून गर्दी गोळा करीत आहेत.

कोरोना असल्यामुळे त्यांनी स्वतः हे थांबवले पाहिजे. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र स्वतःच्या पक्षाचे आमदार, मंत्र्यांकडून होणारे भूमिपूजन, उद्घाटन रोखले जात नाही.

आधी तुम्ही ही भूमिपूजने, उदघाटने थांबवा आणि मग भाजपला राम मंदिराबाबत सल्ला द्या,’ असे खा. विखे म्हणाले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe