अहमदनगर :- 37-अहमदनगर लोकसभा निवडणूकीच्या तिस-या टप्प्यासाठी आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत.
सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही मतदानाची वेळ असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील 2030 मतदान केंद्रावर 18 लाख 54 हजार 248 मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत.
यात 9 लाख 70 हजार 631 पुरुष व 8 लाख 83 हजार 529 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक (पोलींग पार्टी) सोमवारी मतदान साहित्यासह रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदारांनी मुक्त व निर्भयपणे त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
या निवडणुकीत 18 लाख 54 हजार 248 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2030 मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी 4263 बॅलेट युनिट, 2436 कंट्रोल युनिट व 2639व्हीव्हीपॅट वापरले जाणार आहेत.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. द्विवेदी यांच्यासह मुख्य निवडणूक निरीक्षक युवराज नरसिंहन, पोलीस विभागासाठीच्या निवडणूक निरीक्षक भवानीश्वरी यांनीही मतदान साहित्य वाटपाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. वाटप करण्यात आलेले साहित्य आणि मतदान यंत्रे घेऊन पुरेशा बंदोबस्तात संबंधित पथकांना मतदानकेंद्रांवर रवाना करण्यात आले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात आले असून शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा व कर्जत- जामखेड विधानसभा क्षेत्रात 10 मतदान केंद्रावर महिला त्या मतदान केंद्रांचे संचलन करणार आहेत.
या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. शेवगाव मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 133 – जिल्हा परिषद शाळा भगुर, राहुरी मतदार संघातील मतदान केंद्र क्र.50-नूतन मराठी शाळा नंबर 1 राहुरी बुद्रुक, पारनेर मतदार संघातील मतदान केंद्र क्र.184- पारनेर इंदिरा विकास भवन मेन हॉल, जुन्या तहसील ऑफीस जवळ पूर्व बाजू पारनेर,अहमदनगर मतदार संघातील मतदान केंद्र क्र.171- अ.ई.एस.डीएड कॉलेज सावेडी, मतदान केंद्र क्र.172 अ.ई.एस.डीएड कॉलेज सावेडी, मतदान केंद्र क्र.255 आयकॉन पब्लिक स्कुल चाहुराणा बु., मतदान केंद्र क्र.256 आयकॉन पब्लिक स्कुल चाहुराणा बु्. श्रीगोंदा मतदार संघातील मतदान केंद्र क्र.247 श्रीगोंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा शहर, कर्जत जामखेड मतदार संघातील मतदान केंद्र क्र.106 जामखेड ल.ना. हौशिंग विद्यालय जामखेड, मतदान केंद्र क्र. 194 जिल्हा परिषद शाळा, भांडेवाडी यांचा सखी मतदान केंद्रात समावेश आहे.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..