संगमनेरात अकराशे किलो गोमांस जप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  संगमनेर येथून मुंबईला २ लाख रुपये किमतीचे अकराशे किलो गोमांस घेऊन जाणारा पिकअप शहर पोलिसांनी ताब्यात घेतला.

५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंधेरी (मुंबई) येथील युवकाला अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता नाशिक-पुणे बायपासवरील चैतन्य पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी केली.

अब्दुल अली मोहम्मद खान (३८) हा पिकअपमधून (एमएच २० ईजी ३६३५) मुंबईला गोमांस घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. चैतन्य पेट्रोल पंपाजवळ पिकअप अडवण्यात आला. त्यात अकराशे किलो गोमांस आढळून आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe