जमीन विकली तरी कर्ज फिटेना… शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपले जीवन संपविले असल्याची घटना घडली आहे. कैलास रामचंद्र नेमाने (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

दरम्यान हि धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत हद्दीतील कडभनवाडी येथे घडली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील कडभनवाडी ( साकत ) येथील कैलास नेमाने यांच्याकडे दोन एकर जमीन होती.

पंधरा दिवसांपुर्वी अर्धा एकर जमीन विकली होती तरीही कर्ज फिटले नव्हते काही कर्ज बॅंकेचे तर काही खाजगी सावकाराचे होते. अशी माहिती नातेवाईकांनी दिली पंधरा दिवसांपुर्वी अर्धा एकर जमीन विकली होती तरीही कर्ज बाकी होते.

यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते मोठ्या मानसिक तणावाखाली होते. यातच त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची खबर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. नेमाने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात आणला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe