अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : साध्या अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मंडल अध्यक्ष निवडीचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव शहर, ग्रामीण पाथर्डी व शेवगाव या तालुक्यातील मंडलाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत.
त्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचे बिगूल वाजले आहेत. शहराध्यक्षाबरोबरच ग्रामीण जिल्हाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी भाजपने संघटना निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.

यासाठी भाजप प्रदेशने खासदार गिरीश बापट यांची नगर जिल्हा निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष ग्रामीण प्राध्यापक भानुदास बेरड यांनी जिल्ह्याच्या १४ मतदारसंघात भाजपच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे राहाता मतदारसंघातून निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे हेच जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे पक्षांतर्गत निवडणुकीच्या प्रक्रियेतही आता ते अलिप्त असल्याचे दिसून येत आहे.