लागोपाठ चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

Published on -

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा तीन महिन्यांपूर्वी आश्वी बुद्रूक येथे रुग्ण आढळला होता.

तो बाधित रुग्ण ठणठणीत बरा होऊन आल्यानतंर तब्बल तीन महिन्यांनंतर आश्वी परिसरातील शिबलापूर येथे शुक्रवारी एक, तर शनिवारी लागोपाठ चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून

शिबलापूर ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकानी पुढील पाच दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता पुढील पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी बांधित रुग्णाचे आहवाल प्राप्त होताच शिबलापूर ग्रामपंचायतने तत्काळ कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सहा व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवून नतंर तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे,

तर गावातील नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी गाव पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News