अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-श्रीगोंदा तालुक्यात नव्याने सात रुग्ण मिळाल्याने खळबळ उडाली आहे. घारगाव येथे 4 नवे रुग्ण मिळाले. तर चांडगाव व देवदैठण येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोळगाव येथे नवा रुग्ण मिळाला आहे.
दरम्यान कोळगावकरांनी जास्त सावध होण्याची गरज असून आज कोरोना पॉझिटीव्ह आलेला रुग्ण हा मागील रुग्णांच्या संपर्कातील नसल्याने तेथे कोरोना पाय पसरत असल्याची भीती प्रसासन व्यक्त करीत आहे.
दरम्यान काल सापडलेल्या नव्या सात रुग्णात तीन महिला आहेत. तालुक्याचा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आता साठ झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]