खळबळजनक ! काँग्रेस-भाजपच्या महिला नेत्याच चालवित होत्या सेक्स रॅकेट; अनेकांना अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे.

महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता जे प्रकरण समोर आले आहे त्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

राजस्थानमधील सवाईमाधोपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या जिल्हा स्तरावरील महिला पदाधिकारी एकत्रितपणे देहविक्रयचा व्यवसाय चालवित असल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भाजप महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष सुनीता वर्मा उर्फ संपती बाई हिला अटक करण्यात आली आहे. तर काँग्रेस सेवादलातील महिला माजी जिल्हाध्यक्ष पूजा उर्फ पूनम चौधरी फरार झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात सुनीताचा सोबती हिरालाल, कलेक्टर कार्यालयाचा शिपाई श्योराम मीना,

जिल्हा उद्योग केंद्राचा लिपिक संदीप शर्मा आणि इलेक्ट्रिशयन राजूलाल रॅगर यांचा समावेश आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दोन्ही महिला एकत्रितपणे हा गैरव्यवहार करीत होते. सांगितले जात आहे की, याच्या या गैरव्यवहारात अनेक तरुणी आणि महिला अडकल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment