सिरॅमिक फॅक्ट्रीत एलपीजीचा स्फोट; १८ भारतीयांसह २३ जणांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

 खार्तुम : सुदानमध्ये सिरॅमिक फॅक्ट्रीमध्ये एलपीजी टँकरच्या झालेल्या भीषण स्फोटामुळे लागलेल्या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १८ भारतीयांचा समावेश आहे.

या आगीत १३० लोक जखमी झाले असून प्रारंभिक माहितीनुसार सात भारतीयांचा जखमींमध्ये समावेश आहे. सुदानची राजधानी खार्तुमच्या बाह्य भागात असलेल्या सेला सिरॅमिक फॅक्ट्रीमध्ये मंगळवारी हा स्फोट झाला.

अद्याप १६ भारतीय बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय वकिलातीने या स्फोटाची माहिती दिली. आगीत जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण असल्याचे वकिलातीने म्हटले आहे.

बेपत्ता लोकांपैकी काही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment