अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :नगरमधील एका बँकेमध्ये गोल्ड व्हॅल्युअरला हाताशी धरत खोट सोन खरे असल्याचे भासवत बँकेला लाखो रुपयांना ठकवल्याची घटना घडली.
या गैरप्रकारातून बँकेतून २२ लाख २० हजार ३०० रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. या प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअरसह २४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी: नगरच्या सावेडी उपनगरात जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या बँकेची शाखा आहे. याठिकाणी लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर हा गोल्ड व्हॅल्युअर म्हणून कार्यरत होता.
त्याने तब्बल २३ जणांना त्यांनी आणलेले धातुचे दागिने खरे सोन्याचे आहेत, अशा प्रकारचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिले.
संबंधित २३ जणांनी या बनावट प्रमाणपत्राच्या वापर करून बनावट दागिन्यांवर बँकेमध्ये वेगवेगळी ३८ सोनेतारण कर्ज प्रकरणे करून बँकेकडून २२ लाख २० हजार ३०० रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर मिलिंद मधूकर आळंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. २६ ऑक्टोबर २०१८ ते ३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत हा गुन्हा घडला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews