कोरोना झाला आणि दहा लाख रूपये खर्च आला ! अखेर कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  राहुरी येथील सुहास सोनवणे या ४८ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवीली. ही घटना आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी घडली आहे.

सुहास पद्मनाथ सोनवणे राहणार नगर मनमाड रोड, सिनारे हाॅस्पिटल शेजारी, भालचंद्र वसाहत, राहुरी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सुहास सोनवणे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी तसेच एक मतीमंद मुलगा असा परिवार आहे. ते शेती व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सुमारे सहा ते सात महिन्यापूर्वी त्यांची पत्नी पुष्पा सोनवणे ह्या कोरोना बाधीत झाल्या होत्या. त्यांच्यावर राहुरी तसेच नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार केले.

त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी नऊ ते दहा लाख रूपये खर्च आला होता. या कोरोना महामारीतून पुष्पा सोनवणे ह्या बचावल्या मात्र सुहास सोनवणे यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला होता.

घरची परिस्थिती बेताची व आर्थिक उत्पन्न कमी असल्याने सुहास सोनवणे यांना कर्ज फेडणे मुश्किल झाले होते. अशा परिस्थितीत ते तणावपूर्ण जिवन जगत होते. या तणावपूर्ण जिवनाला व कर्जाला कंटाळून त्यांचे अखेर टोकाचे पाऊल उचलले.

आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरात छताला असलेल्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe