पीक जोमात तरीही शेतकरी संकटात; पिकांबाबत होतंय ‘असे’ काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले.

आता केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील शेतकरी वेगळ्याच गोष्टींशी झुंज देत आहे. वेगळेच संकट त्याच्यावर ओढवले आहे. बटाटा, भुईमूग, सोयाबीन या खरीप पिकांची वाढ जोमदार झालेली आहे.

परंतु या पिकांना फळधारणाच झालेली नाही. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसर बटाटा पिकाचे पारंपारिक आगार समजला जातो. मात्र यंदा या पिकांना फळधारणाच झाली नाही.

ब्राह्मणवाडा परिसरात यंदा बटाटा लागवडीत प्रचंड घट झाली आहे. केवळ 30 टक्के शेतकर्‍यांनीच बटाटा लागवड केली आहे. त्यात ज्योती, पूखराज व 3494 या वाणांची लागवड झाली.

लागवडीपूर्वी पहिले वादळ झाले. लागवडीच्यावेळी पुरेशी ओल नव्हती. लागवडी नंतर पाऊस कमी झाला. दरम्यानच्या काळात उष्णता वाढत गेली.

या पिकाला पोषक अशी थंडी मिळाली नाही आणि नंतर लाल करपा व काळा करपा प्रादुर्भाव झाल्याने बटाटा, भुईमूग, सोयाबीन या पिकांची वाढ झाली पण फळधारणा झाली नाही.

हा यावर्षीच्या हवामानाचा परिणाम असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहेत. दोन ते अडीच महिने होऊनही करंडी गावातील बटाटा पिकाची पाहणी करत असताना बटाटा पिकाला एकही बटाटा आलेला दिसला नाही.

केवळ मुळ्याच दिसल्या.हे पाहून सर्व शेतकरी आश्चर्यचकित झाले. गावातील सर्वच शेतकर्‍यांच्या बटाटा पिकाची अवस्था सारखीच असल्याने सर्व शेतकरी चिंतेत आहेत.

लोकांकडून हात उसने पैसे घेऊन बटाटा बियाणे 2200 रु. ते 2600 रु. प्रतिक्विंटलने 25 क्विंटल बटाटे लागवड केली. बियाणे, खते-औषधे, मजूर इत्यादी भांडवल जवळजवळ 70 हजार रुपये एवढा खर्च झाला.

येत्या दहा पंधरा दिवसांत बटाटा काढणीला येईल परंतु झाडाला बटाटे न आल्याने आता आम्ही चिंतातुर झालेलो आहोत अशी विवंचना एका शेतकऱ्याने मांडली.

शासनाने पीक परिस्थिती पहावी आणि शेतकर्‍यांना अपेक्षित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ब्राह्मणवाडा, करंडी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment