अच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त घोषणा करून त्यांची चेष्टा केली. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कधी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही.

शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीस लावले, अशी भावना राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये नगर, श्रीगोंदे, जामखेड व कर्जत तालुक्यांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

शेतकऱ्यांचे खरे सरकार येण्यासाठी राष्ट्रवादीत दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले. अंजना पवार, महेश जगताप, संदीप सुरवसे, संतोष कोकाटे, शारदा ठोंबरे, कमला माळी, शंकर पवार, हाजी इम्रान युसूफ, शहाजी गोरे, दिलीप कांकरिया हे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment