फेसबुक पुन्हा वादात, ४१ कोटी यूझर्सचे फोन नंबर लीक !

Ahmednagarlive24
Published:

 वॉशिंग्टन : जगातील आघाडीचे सोशल माध्यम असलेले फेसबुक डेटा चोरीवरून पुन्हा वादात आले आहे. फेसबुकच्या ४१.९ कोटी वापरकर्त्यांचे फोन नंबर चोरीला गेल्याचे वृत्त आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामुळे वापरकर्त्यांना फेक कॉल आणि सीम स्वॅपिंगसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो; परंतु फेसबुकने ही माहिती जुनी असून यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.. फेसबुकच्या सर्व्हरवरून जवळपास ४१.९ कोटी वापरकर्त्यांच्या मोबाईल क्रमांकावर धाड टाकण्यात आल्याचे वृत्त टेकक्रंच या संकेतस्थळाने दिले आहे.

यामध्ये अमेरिकेतील सर्वाधिक वापरकर्त्यांंचा समावेश आहे. अमेरिकेतील १३.३ कोटी, व्हिएतनामधील ५ कोटी आणि ब्रिटनमधील १.८ वापरकर्त्यांच्या नंबरवर डल्ला मारण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या डेटामध्ये सर्व वापरकर्त्यांची आयडी मोबाईल क्रमांकाशी जोडण्यात आलेली होती. याशिवाय यामध्ये वापरकर्त्यांचे नाव, लिंग आणि त्यांचा पत्ता यांसारखी गोपनिय माहिती होती.

सर्व्हरला कुठल्याही प्रकारचे पासवर्ड नसल्याने कोणीही या माहितीमध्ये सहजपणे घुसखोरी करू शकत होते, असे संकेतस्थळाने म्हटले आहे. फेसबुकने वृत्तातील काही भागाला दुजारा दिला आहे. पण त्याचबरोबर ही माहिती जुनी असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment