नेवाशाच्या नगराध्यक्षपदासाठी सरळ लढत

Ahmednagarlive24
Published:

नेवासा – नेवासाच्या नगराध्यक्षपदाची उद्या बुधवारी निवड होणार आहे.  काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने भाजपा- काँग्रेस व अपक्षांच्या नगरपंचायत विकास आघाडी व आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीकारी शेतकरी पक्षात सरळ लढत होणार आहे.

भाजपच्या डॉ. सौ. प्रमिला सांगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्या मुळे  नगरपंचायत विकास आघाडीतील सदस्य असलेल्या सौ. शालिनी संजय सुखदान आणि  क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेविका योगीता सतीश पिंपळे यांच्यात सरळ लढत होणार आहे. दोन्ही गटांकडे समसमान संख्याबळ आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले  आहे प्रभाग क्रमांक तेरातील नगरसेविका फेरोजबी इमामखान पठाण यांचे पद रद्द झाल्याने क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 9 वरून 8 झाली आहे.

तर गट नोंदणीमध्ये भाजपा, इंदिरा काँग्रेस व अपक्ष मिळून बनलेल्या नगरपंचायत विकास आघाडीचे 8 नगरसेवक आहेत. समसमान नगरसेवक दोन्हीकडे असल्याने कोण बाजी मारणार याबाबत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन काम पाहत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment