त्या नायब तहसीलदारावर गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी नायब तहसीलदार व त्याच्या पत्नीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.

राजाराम बाळासाहेब गायकवाड (५६, नेमणूक सुरगणा तहसील कार्यालय, जि. नाशिक) व पत्नी सुशीला (५४, गृहिणी, रेणुकानगर, केडगाव, नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींच्या केडगाव येथील घरावर छापा टाकून चौकशी करण्यात आली. ‘लाचलुचपत’चे निरीक्षक श्याम पवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

गायकवाड १९८३ मध्ये नगर जिल्ह्यात तलाठी म्हणून रुजू झाला. त्याने पारनेर तालुक्यात तलाठी व मंडल अधिकारी म्हणून काम केले. त्याच्या मालमत्तेसंदर्भात आलेल्या तक्रारीवरुन चौकशी केली असता सर्व ज्ञात स्त्रोतांमधून मिळालेले कायदेशीर उत्पन्न,

एकूण खर्च व त्या कालावधीत त्यांनी मिळवलेल्या मालमत्तेचा अभ्यास केला असता त्याने १९९१ मध्ये ६ लाख ८ हजार ४१०, २००१ मध्ये ६५ हजार,

२००२ मध्ये २ लाख २२ हजार ७६०, २००४ मध्ये १४ लाख ४१ हजार ३५५ रुपयांची जास्त मालमत्ता जमवल्याचे उघड झाले. त्यासाठी पत्नीने प्रोत्साहन दिल्याने दोघांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment