अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : अहमदनगर शहरात कोरोनाचे संक्रमण कापड बाजार येथील कोहिनूर क्लॉथ स्टोअर येथून वाढले असताना, नियमांची पायमल्ली करुन कोरोना वाढीस कारणीभूत ठरल्याचा आरोप करीत
आम आदमी पार्टीच्या वतीने कोहिनूरच्या चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी अॅड. जावेद काझी, रवी सातपुते, भरत खाकाळ, शकील शेख उपस्थित होते.
मागील आठवड्यात अहमदनगर शहरातील अचानक शहराचे मध्यवर्ती दाट वस्तीच्या तोफखाना भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. हे संक्रमण दिवसंदिवस वाढत असताना शहरात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.
अटी व शर्ती घालून प्रशासनाने शहरातील कापड दुकाने ठरावीक काळ उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन कापड बाजार अहमदनगर येथील कोहिनूर क्लॉथ स्टोअर सुरू झाले. सदरच्या दालनात शहरातील सुमारे दोनशे कर्मचारी कार्यरत आहे.
प्रशासनाने कोरोनाचे प्रादुर्भाव वाढू नये म्हणून फिजीकल डिस्टन्स, सॅनिटायझर, स्वच्छता आदि नियमांची दक्षता घेण्याचे निर्देश दिले होते. कोहिनूरचे मालक व चालक यांनी एकाच वेळी चारशे ते पाचशे कस्टमरांना प्रवेश देऊन जोरात व्यापार सुरू केला.
त्यामुळे दुकानात काम करणार्या कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली. शहरातील मध्यभाग हॉटस्पॉट झाल्याने त्याचा गंभीर परिणाम सामान्य जनतेवर पडू लागला आहे. याला कोहिनूरचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरात कोरोना संक्रमण वाढीस जबाबदार असणार्या कोहिनूर क्लॉथ स्टोअर प्रकरणाची चौकशी व्हावी, सदर स्टोअरचे सीसीटिव्ही फुटेज तपासावे व संबंधीत स्टोअरच्या चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews