अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : काष्टीतील धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २०१३-१८ च्या लेखापरीक्षणात आढळलेल्या ५४ लाख १८ हजारांच्या अफरातफरीबाबत अध्यक्ष ज्योती गवळी, त्यांचे पती रमेश सर्जेराव गवळी व व्यवस्थापक भारत सदाशिव डोईफोडे यांच्या विरोधात श्रीगोंदे ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
गवळी दाम्पत्य व डोईफोडे याने पदाचा गैरवापर संस्थेकडे जमा झालेल्या ठेवीच्या पैशांचा अपहार केला, अशी फिर्याद शासकीय लेखापरीक्षक सर्जेराव जामदार यांनी दिली आहे.

अवसायक एस. एम शेलुकर यांनी संस्थेचे दप्तर उपलब्ध करुन दिल्यानंतर संस्थेचे लेखापरीक्षण २८ फेब्रुवारीला पूर्ण करण्यात आले.
संस्थेने ठराव करुन अध्यक्ष ज्योती गवळी यांचे पती रमेश गवळी (कौठा) यांना हातावरील रोख शिल्लक बाळगण्याचा अधिकार दिला होता.
अध्यक्ष, सचिव आणि अध्यक्षच्या पतीने संस्थेच्या दप्तरात बनावट नोंदी करून बनावट कागदपत्रे तयार करुन ठेवीदारांचा विश्वासघात करुन अफरातफर केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews