अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- मोहटादेवी मंदिर बांधताना पायात सोने पुरल्याच्या प्रकराबाबत त्यावेळचे अध्यक्ष नागेश बी. न्हावळकर, विश्वस्त व मुख्यकार्यकारी अधिकारी
यांच्या विरुद्ध कट रचुन आर्थिक फसवणुक करणे व अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी, कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळी जादु नियम २०१३ कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सहा पदाधिका-यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की, एक जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०११ या कालावधीमधे मोहटादेवीचे मंदिर बांधताना मंदिराच्या पायामध्ये अठराशे नव्वद ग्रँम सोने पुरले. सुवर्णयंत्रे बनविण्यासाठी मजुरी चोवीस लाख पंच्यांशी हजार रुपये दिले.
हे सर्व अंधश्रद्धेतुन केले. मंदिर परीसरात सकारात्मक उर्जा तयार व्हावी यासाठी हे केल्याचा दावा त्यावेळच्या अध्यक्ष, विश्वस्त व मुख्याधिकारी यांनी केला होता. याला विरोध करुन तत्कालीन विश्वस्त नामदेव गरड यांनी आवाज उठवला होता. ट्रस्टच्या पैशाचा गैरवापर केला म्हणुन औरंगाबाद उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती.
त्यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सात मार्च २०१७ रोजी निवेदन करुन न्यायालयाला याबाबत चौकशी करुन संबधीतावर गुन्हे दाखल करुन पैशे वसुल करुन ते सरकारी तिजोरीत जमा करावेत अशी मागणी केली होती.
३ फेब्रुवारी २०२१ रोजी औरंगाबादच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी याबाबत गुन्हे दाखल करुन चौकशी करुन सहा महीन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यअध्यक्ष अविनाश पाटील, बाबा आरगडे, अँड.रंजना गवांदे, प्रकाश गरड, अर्जुन हरेल, प्रमोद भारुळे यांच्या तक्रारीवरुन पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
त्यावेळचे जिल्हा न्यायाधीश नागेश बी. न्हावळकर, विश्वस्त व मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यामधे काही न्यायाधीश, तहसिलदार, वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी व इतर विश्वस्त यांचा समावेश आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved